NASA | Water on Moon | चंद्राच्या 40 हजार चौ. किमी क्षेत्रावर पाणी सापडलं, नासाचा दावा
Continues below advertisement
चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. नासाने पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असं नासाने म्हटलं आहे. नासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
चंद्राच्या सूर्यप्रकाशीत भागांतही पाणी असल्याचा शोध नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेनेलावला आहे. चंद्रावर पाणी सापडणे महत्त्वाचं असल्याचही नासाने म्हटलं आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादीत नसून, चंद्राच्या सूर्यप्रकाशीत पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याची माहिती या शोधातून समोर येत आहे.