Mumbai : दुधात अस्वच्छ पाण्याची भेसळ करणारी टोळी गजाआड, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Continues below advertisement

Adulterated Milk : आपण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महागडी दूध विकत घेत असाल तर कदाचित या महागड्या दुधात उलट आरोग्य बिघडविणारे अस्वच्छ पाणी असू शकते. मुंबई पोलिसांचा गुन्हे कक्ष सात ने घाटकोपर च्या पंतनगर मधील गुरुनानक नगर मध्ये एक अशी टोळी गजाआड केली आहे, जी गोकुळ, अमूल , महानंदा, गोविंद अश्या नामांकित दूध कंपन्याच्या पिशवीतील दूध काढून घेत त्यात अस्वच्छ पाणी भरत आणि त्या काढलेल्या दुधात पाणी भरून पुन्हा नव्या बनावट ब्रँड च्या बनविलेल्या पिशव्यांमध्ये भरून विकत होते.मात्र गुन्हे कक्ष सात च्या  सहायक पोलिस निरीक्षक सूनयना सोनवणे यांना या बाबत त्यांच्या गुप्त बातमीदारने या बाबत ची माहिती दिली.

त्यानंतर युनिट 7 चे पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या ठिकाणी छापा टाकला.या वेळी त्यांना 619 लिटर भेसळ केलेले दूध आढळले. त्याच बरोबर अमूल व गोकुळ दूध कँपनी च्या 1655 बनावट प्लास्टिक पिशव्या व दुध भेसळ करण्यास लागणारे साहित्य ही पोलिसांनी जप्त केले आहे.या टोळीतील चौघांवर विविध कलमांतर्गत पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram