Extreme Workout : व्यायामाचा अतिरेक टाळा, जास्त व्यायामाने काय दुष्परिणाम होतात? काय काळजी घ्याल?

Continues below advertisement

मुंबई : आपण अनेकदा ऐकतो की, हृदयविकाराचा झटका हा साठी किंवा सत्तरीनंतरच्या व्यक्तींमध्ये येतो. अशी अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. पण आता विशीतील तरूणाचा मृत्यू हृदयाचा झटका आल्याने झाल्याचं समोर येतं आहे. त्यातच आता तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमितवेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहेत. 

अचानक हृदयाचा झटका म्हणजे हार्टअटॅक येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत न होणं, हृदयाच्या धमण्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. परंतु, अनेकदा धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हृदयविकाराचा झटका आलेला सुद्धा बऱ्याचदा कळत नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram