Mumbai Crime : मुदत संपलेली सौंदर्यप्रसाधनं विकणाऱ्यांवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Continues below advertisement

विदेशी कंपन्यांची मुदत संपलेली सौंदर्यप्रसाधनं कमी किमतीत आयात करून, मग वाढीव दरानं मुंबईतल्या ब्युटी शॉप्समध्ये विकणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून सारा माल ताब्यात घेण्यात आला आहे. ही सौंदर्यप्रसाधनं बाजारात खपवण्यासाठी त्याच्या वापरासाठीची मुदत आणि किमतीच्या आकड्यात फेरफार करण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखा युनिट अकराच्या पोलिसांनी एकाच वेळेस मुंबईतील गोरेगाव, क्राॅफर्ड मार्केट आणि दाणाबंदर परिसरातील गोडाऊन्सवर धाडी टाकल्या आहेत. या धाडींमध्ये तीन कोटी 28 लाख 711 रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधनं आणि तेरा लाख 19 हजार 410 रुपयांची रोख रक्कमशहस तसंच इतर मुद्देमाल जप्त केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram