लुटणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई, Kalyan RTO चा रिक्षाचालकांना इशारा, तक्रारीसाठी WhatsApp नंबर
कल्याण डोंबिवलीमध्ये जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात आरटीओने कारवाईचा इशारा दिलाय. कल्याण डोंबिवलीत जास्तीचे भाडे आकरले जात असल्याच्या तक्रारी कल्याण आरटीओकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारीकरीता व्हॉटसअप नंबर जाहीर केलाय. त्या नंबरवर तक्रार केल्यास रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे.