Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री ? ACP दर्जाचे अधिकारी चौकशी करणार

Continues below advertisement

पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. काल दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात समीर वानखेडेंची जवळपास दीड तास चौकशी झाल्याचं कळतंय. तर आज  एनसीबीच्या दक्षता समितीकडून समीर वानखेडेंची चौकशी होण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती समीर वानखेडेंची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे प्रभाकर साईल यांना देखील एनसीबीच्या दक्षता समितीनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. प्रभाकर यांना दुपारी १२ वाजता एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram