Thane Crime : ठाणे बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीची फाशीची शिक्षा कायम

ठाणे कासारवडवलीमध्ये २०१३ साली झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात मात्र उच्च न्यायालयानं आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.   30 सप्टेंबर 2013 रोजी घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीला नराधम रामकीरत गौडने जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला होता आणि नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या परिसरातील एका खंदकात लपवला होता. स्थानिक पोलिसांनी गौडला 30 ऑक्टोबर 2013 रोजी अटक केली आणि नंतर त्याच्याविरोधात विशेष पोक्सो कोर्टात खटला चालला. न्यायालयानंत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती जी उच्च न्यायालयानं कायम ठेवलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola