Bus Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात, ब्रेक फेल झाल्यानं अपघात
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 02:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात झालाय. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासची सहल मावळ येथे जात असताना हा अपघात झालाय. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बसचालक चैतू ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचं बसचालकानं सांगितलंय.