Mumbai CBSE : मराठी पालक इंग्रजी शाळांकडे का झुकतोय? पहा हा स्पेशल रिपोर्ट
मुंबई महापालिकेच्या इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई आणि आता येऊ घातलेल्या केंब्रिज बोर्डाच्या शाळांकडे मराठी विद्यार्थी पालकांचा ओढा वाढतोय. या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी हजारोच्या संख्येने पालक अर्ज करत आहेत. परिणामी, या शाळांच्या तुलनेत मराठी शाळा मात्र या स्पर्धेत बंद पडायला लागल्याचं चित्र आहे. ज्याप्रकारे इंग्रजी त्यासोबतच इतर बोर्डांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातोय, खर्च केला जातोय, तसा मराठी शाळेसाठी प्रयत्न होतोय का? मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी खरंच पावले उचलली जात आहेत का? की मराठी शाळा अशाच बंद होत राहतील? असे अनेक प्रश्न आहेत.