ABP Majha Headlines : 11 PM : 12 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत पुन्हा आग, स्फोटांचेही आवाज, कंपनीतील आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण 

कीटकनाशके बनवणाऱ्या इंडो-अमाईन्स कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या आणि पाण्याचे टँकर्स घटनास्थळी, शेजारील शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवलं 

निधीवाटपात महाराष्ट्रावर केंद्राचा अन्याय, मोदी सरकारकडून विकास निधीवाटपात राज्याला केवळ ८ हजार कोटी... यूपी, बिहारला घसघशीत निधी 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून आघाडी युती धर्माची कसोटी, आज अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस, चारही जागांवरून महायुती, मविआच्या घटकपक्षांची आपापसातच रस्सीखेच 

राज्यसभेसाठी अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना, उद्या अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस... सुनेत्रा पवार,  पार्थ पवार आणि छगन भुजबळांचं नाव चर्चेत 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची आज २८८ संपर्कप्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola