Majha Maharashtra Digital Maharashtra | एबीपी माझाच्या ब्लॉग माझा आणि मीम्स स्पर्धेचा निकाल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्रथम पुरस्कार यशोधन जोशी आणि कौस्तुभ मुद्गल यांना, द्वितीय अनिल गोविलकर, तर तृतीय क्रमांक नितीन साळुंखे, अमोल कुलकर्णी यांना मिळाला आहे. आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी कवी, साहित्यिक बालाजी सुतार तसेच लेखक ह्रषिकेश गुप्ते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
एबीपी माझाकडून यंदा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मीम स्पर्धेचे देखील निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार अनिकेत मेढेकर यांना देण्यात आला आहे. मीम स्पर्धेचे द्वितीय पुरस्कार ऋतुजा पाटील यांना मिळाला आहे. तर तृतीय पुरस्कार फैजल खान आणि क्षितीज वर्मा यांना देण्यात आला आहे. तर क्षितीज वर्मा यांनी एका विद्यार्थ्यांच्या व्हायरल फोटोवर मीम बनवलं आहे.