Aaditya Thackeray Full Speech : उदय सामंत यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंचं घणाघाती भाषण ABP MAJHA
Continues below advertisement
Aaditya Thackeray : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निष्ठा यात्रेतील पुढील टप्प्याची सुरुवात रत्नागिरीतून (Ratnagiri) केली. यावेळी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले. मुख्यमंत्री गणपतीत 250 मंडळं फिरली, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळी फिरायचे असेल. मात्र, त्याआधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत आदित्य यांनी हल्लाबोल केला. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाबाबत काहीही माहिती नसणे हे धक्कादायक असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
Continues below advertisement