Corona : दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतलेल्या महिलेला कोरोनाच्या XE व्हेरियंटची लागण झालेली नाही
गुढीपाडव्याला महाराष्ट्र मास्कमुक्त झाला... मात्र हा दिलासा औटघटकेचा ठरतो का अशी चिंता सतावू लागली... आणि त्यामागचं कारण म्हणजे मुंबईत कोरोनाच्या XE व्हेरियंटनं शिरकाव केल्याचं वृत्त... दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महिलेला XE व्हेरियंटची लागण झाल्याचा संशय स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र काळजी करु नका.. मुंबईतील महिलेला XE व्हेरियंटची लागण झाल्याचे कोणतेच सबळ पुरावे नसल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय.. त्यामुळं तूर्तास तरी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जीव भांड्यात पडलाय असं म्हणायला काही हरकत नाही. XE व्हेरियंट हा ओमायक्रॉनच्या म्युटंटचं संमिश्र रुप आहे... काही देशात या व्हेरियंटमुळंच कोरोनाची चौथी लाट आली होती..