Kirit Somaiya:किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गुन्हा दाखल, माजी सैनिक बबन भोसलेंनी दाखल केली तक्रार

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नल सोमय्या आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आणि कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती.त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola