2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा 80 टक्के भाग बुडणार? मंत्रालय, कफ परेड पाण्याखाली जाणार?

Continues below advertisement

Mumbai : हवामान बदलाचा धोका गांभीर्यानं घेतला नाही तर 2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हा धोका वर्तवलाय. कफ परेड, नरीमन पॉईंट, मंत्रालयासारखे भाग जलमय होण्याचाही धोका आहे.

निसर्गाकडून वारंवार मिळणारे संकेत लक्षात घेतले नाहीत तर हा धोका उद्भवण्याचा इशारा चहल यांनी दिलाय. तब्बल 129 वर्षात पहिल्यांदा एखादं चक्रीवादळ मुंबईला धडकलं होतं असं चहल म्हणाले. निसर्ग चक्रीवादळानंतर फक्त 15 महिन्यातच मुंबईला 3 चक्रीवादळांचा सामना करावा लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram