ऐन दिवाळीत आमच्या कुटुंबांची उपासमार.. 650 शिक्षक थेट शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर करणार आत्मदहन

Continues below advertisement

विना वेतन किंवा अल्प मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील 650 शिक्षकांनी थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दिवाळीत आमच्या कुटुंबांची उपासमार होताना आम्हाला पाहिला आवडणार नाही यासाठी आम्ही आता शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आत्मदहन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीने दिला आहे. याबाबत बोलताना संदीप रेतवाढे  म्हणाले की आता आमची मुलं हातातोंडाशी आली तरी देखील आम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. आता दिवाळी साजरी करणं देखील आम्हाला मुश्किल झाली आहे. त्यामुळे आता आत्महत्या करावी की काय अशी अवस्था आमची झाली आहे अशी भावना व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram