पालघर जिल्ह्यात 2 महिन्यात कुपोषणामुळे 40 बालमृत्यू, कोरोनाकाळात कुपोषणग्रस्त भागाकडे दुर्लक्ष
Continues below advertisement
कोरोना काळात ग्रामीण भागातील अंगणवाडी , ग्राम बाल विकास केंद्र आणि पालघर जिल्ह्यातील डगमगलेली आरोग्यव्यवस्था याकडे दुर्लक्ष झाल्याने या मृत्यु दरात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच चाळीस बालमृत्यू आणि पाच माता मृत्यूची नोंद झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्यावर्षी वर्षभरात जिल्ह्यात 296 बालमृत्यू तर बारा माता मृत्यूची नोंद झाली होती. मात्र यावर्षी सुरुवातीलाच ही आकडेवारी वाढल्याने पालघर जिल्हा पुन्हा कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू यांच्या विळख्यात सापडलेल्या पाहायला मिळतोय.
Continues below advertisement