मी ऊर्जा खात्यावर आरोप केले नाहीत, खनिकर्म महामंडळात अनियमितता झाल्याचा आरोप केला : नाना पटोले
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांना धमाकेदार पत्र लिहिले आहे, हे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे. या पत्रातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या गैरकारभाराकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्याच्या खात्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत, खात्यात घोळ, पदाचा दुरुपयोग तसेच येणाऱ्या काळात एकूणच महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर त्याचा होणारा वाईट परिणाम ह्याबाबत त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की नाना पटोले यांचे बोट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आहे.