Ambernath : रंग लावण्याच्या भीतीनं गच्चीत पळाला, अन घात झाला! गच्चीतून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Continues below advertisement

Ambernath :  अंबरनाथच्या शिवाजीनगर भागातील सुरज मोरे हा २६ वर्षीय तरुण वास्तव्याला होता. धुळवडीच्या दिवशी सुरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारी १ च्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नव्याने झालेल्या इमारतीत अविनाश वास्तव्याला असून याच इमारतीखाली हे तिघे बोलत उभे होते. यावेळी त्यांच्याच परिसरातले इतर काही मित्र तिथून जात असताना त्यांना सूरज आणि तुषार दिसल्याने ते त्यांना रंग लावण्यासाठी आले. यावेळी सूरज आणि तुषार हे दोघेही इमारतीत पळाले. तुषार हा पहिल्या मजल्यावर लपला, तर सूरज हा थेट गच्चीत जाऊन लपला. यावेळी तुषार याला मित्रांनी पकडून खाली आणलं, मात्र त्याला रंग लावत असतानाच अचानक सूरज हा गच्चीतून खाली पडला. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram