Mumbai : राणीच्या बागेतील 200 कोटींचं कंत्राट अखेर रद्द; विरोधी पक्षांचे आरोप, हेराफेरीचा संशय

Continues below advertisement

Mumbai News : मुंबईतील राणीच्या बागेमध्ये ( Veermata Jijabai Udyan) नव्याने येणाऱ्या दुर्मिळ प्रजातींच्या प्राण्यांसाठी पिंजरे व इतर विकास कामांसाठी देण्यात आलेले कंत्राट आता महापालिका प्रशासनाने रद्द केले आहे. तब्बल 200 कोटींचं हे कंत्राट मुंबई महापालिकेनं रद्द केल्याचे समजते. या कंत्राटावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आरोप केले होते. याशिवाय ठाकरे सरकारमधील काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनीही या कंत्राटात आर्थिक हेराफेरी असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर हे कंत्राट आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसल्याचे मुंबई महापालिकेकडून लेखी स्वरुपात मान्य करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram