Mumbai Corona Update : मुंबईत 20,181 नवे कोरोना रुग्ण, 24 तासात 4 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा कोरोना महामारीने (Corona Virus) हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारनंतर गुरुवारीही मुंबईतील नव्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Continues below advertisement