11th Admission : अकरावीची शेवटची प्रवेश फेरी 10ऑगस्टला, मुंबई विभागात दीड लाख जागा शिल्लक
दहावी पास विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीत प्रवेश घेतला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आता शेवटची संधी राहिलीये. १० ऑगस्ट रोजी विशेष प्रवेश फेरीची शेवटची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या फेरीनंतर यंदाच्या वर्षीचे अकरावी प्रवेश बंद होणार असल्याचं माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलंय. त्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आलीये. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी अद्याप दीड लाख जागा शिल्लक आहेत. तर, दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश न मिळालेले ७ हजार ९३९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.