Thane Bullet Train: ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी 100 टक्के भूसंपादन पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता गती मिळू लागलीय. ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी १०० टक्के भूसंपादन करण्यात आलंय. जमिनीचा ताबाही नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनला दिला आहे. त्यासाठी काही गावात असलेलं अतिक्रमण हटवून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर करण्यात आलाय. ठाणे शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा  नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्यानंतर तातडीनं कार्यवाही जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola