Mumbai govt office timing | कोरोना काळात कार्यालयीन वेळांबाबत केंद्रानं धोरण आखावं : मुख्यमंत्री

कोरोनाचा लढा हा संपलेला नाही, कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपारिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आखावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळांमध्येही आता बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई लोकल सुरु केल्यानंतर सर्वसामान्यां लोकल प्रवास करण्यासाठी काही वेळा ठरवून दिल्या होत्या. त्यावेळी कामकाजाची वेळ बदलण्यासाठी राज्य सरकारनं सर्व कार्यालयांना विनंती आणि आवाहन केलं होतं. अशातच आज जेव्हा निती आयोगाची बैठक होती, त्यावेळी थेट पंतप्रधानांसमोर ही बाब मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे.