MPSC 24/7 HELPLINE | MPSC कडून उमेदवारांच्या अडचणी निवारणासाठी टोल फ्री सुविधा सुरू होणार
मुंबई : राज्यभरातून दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा हजारो उमेदवार देत असतात. त्यामुळे अशा स्पर्धापरीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी खास सुविधा उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री- हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे.