Narendra Modi Stadium Ahemdabad | अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचं नवं नाव 'नरेंद्र मोदी स्टेडियम'
Continues below advertisement
अहमदाबाद : अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नावाने ओळखलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. 'नरेंद्र मोदी स्टेडियम' स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
Continues below advertisement