Buldhana Corona | बुलडाण्यातील झाडेगावात 155 कोरोनाचे रुग्ण, सात दिवसांचा कार्यक्रम ठरला धोका

Continues below advertisement

बुलढाणा जिल्ह्यातिल जळगाव जामोद तालुक्यातील झाड़ेगाव या गावात काही दिवासांपूर्वी एक सात दिवासांचा धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांनीच आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह काही बाहेरगावहून मंडळी सामील होत होती. परंतु कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे गावात संसर्ग पसरला आणि बघता बघता छोट्याशा गावात 155 जणांना कोरोना झाला. आता गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून गावात आरोग्य पथक, महसूल व पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. गावातील प्रत्येकाची टेस्ट करण्यात येत आहे, गावाची लोकसंख्या जेमतेम सातशेच्या जवळपास आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram