अधिवेशनाआधीच राष्ट्रवादी नेत्यांना कोरोना कसा होतो? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारला सवाल
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विधीमंडळ अधिवेशन सुरु होण्याआधी कोरोनाची आकडेवारी कशी काय समोर येते असं देशपांडेनी विचारलं. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोरोना होता, पण भाजपच्या नेत्यांना का होत नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.