Yuvasena on Fuel Price | यही है अच्छे दिन? पेट्रोल दरवाढीविरोधात मुंबईत युवासेनेची पोस्टरबाजी

Continues below advertisement
मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. काही दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती शंभरी पार करतील असं दिसतंय. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईत देखील मध्यरात्री जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचं काम सुरु होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram