MNS : मनसेची सागरी किनारे स्वच्छता मोहिम : ABP MAJHA
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे स्पर्धेचा दुसरा अंक सुरु होणार आहे. आदित्य ठाकरेंकडे पर्यावण खातं असताना दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या सागरी किनाऱ्यांच्या सफाईची मोहीम हाती घेतली. राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र यानिमित्तानं अमित ठाकरे यांनी सफाईदारपणे आपलेच चुलत बंधू आदित्य ठाकरेंची झाडाझडती घेतली..अमित ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंवरच नाकर्तेपणाचा आरोप केला. महापालिका निवडणुकांच्या पटावर अमित ठाकरेंनी पहिली चाल चालली आहे. त्याला आता आदित्य ठाकरे कसं उत्तर देतात.. हे बघायचंय...
Tags :
Maharashtra Shiv Sena Amit Thackeray Aditya Thackeray MNS Politics महाराष्ट्र शिवसेना मनसे राजकारण अमित ठाकरे आदीत्य ठाकरे राजकारण मनसे शिवसेना अमित ठाकरे