मिरा रोड हादरवणारा सिलेंडर स्फोट, एकामागोमाग एक 12 सिलेंडरचे स्फोट, दुर्घटनेत एक स्थानिक जखमी

Continues below advertisement

मुंबई : रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरलं आहे. रात्री 2 वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास 12 स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram