Asaduddin Owaisi Live : MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी सभास्थळी पोहचले
एमआयएम खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी मुंबईतील चांदिवली येथील सभेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. मी मुंबईत येऊ नये म्हणून पूर्ण ताकद लावली. पण मी अखेर मुंबईत आलो. रॅली दरम्यान पोलिसांनी अनेकदा अडवलं. औरंगाबादवरुन आम्ही 225 गाड्या घेऊन आलो. अनेक ठिकाणी आम्हाला आडवलं. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे पुढे नाही जाऊ देणार, असं सांगितलं गेलं. पण आम्ही मुंबईत आलोच. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. ते फक्त आदेश मानत होते. त्यात त्यांची काहीच चूक नव्हती, असे इम्तियाज जलील म्हणाले.