Bappa Majha 2020 | कल्याणमध्ये गणेशभक्ताने साकारला मेट्रोचा देखावा,भास्कर म्हस्केची कलाकृती!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याणमध्ये 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र दोन वर्षात या प्रकल्पाची वीटही रचली गेलेली नाही. त्यामुळे कल्याणच्या भास्कर म्हस्के यांनी त्यांच्या घरगुती बाप्पासमोर मेट्रोचा देखावा उभारलाय. यात दुर्गाडी किल्ला, कल्याण खाडी, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी प्रस्तावित मेट्रो स्टेशन्सही उभारण्यात आली असून दोरीच्या साहाय्याने ही घरगुती मेट्रो धावतेय. कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं, आणि मेट्रो लवकर सुरू व्हावी, असं साकडं यातून बाप्पासमोर घालण्यात आलंय.