Sawatsada Waterfall | रत्नागिरीतील सवतसडा धबधबा प्रवाहित, धुक्याची चादर अन् कोकणाचं निसर्गसौंदर्य!

कोकणात पडणाऱ्या संततधार पावसामुळे डोंगर कपारीतील धबधबे प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यातीलच एक मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणचा सवतसडा धबधबा. हा धबधबा महामार्गाच्या लगत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणाऱ्याची  नजर जाते ती फेसाळणाऱ्या धबधब्यावर. त्यामुळे सहाजिकच आहे की प्रवासी तेथे थांबतोच आणि त्याची मज्जा लुटतो, पण आता सध्या चित्र वेगळं आहे. कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात हे धबधबे एकटे पडलेत. पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola