Community Corona Spread | भारतात कोरोनाचा समूह संसर्ग, दररोज 30हजार रुग्णांची वाढ चिंताजनक - IMA

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसचे 10 लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशात कोरोनाचा समूह संसर्ग (Community Transmission) सुरु झालं असल्याचं म्हटलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. के मोंगा यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. डॉ. मोंगा म्हणाले की, प्रत्येक दिवशी देशात 30 हजारहून जास्त रुग्ण समोर येत आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे. आता हा संसर्ग देशातील ग्रामीण भागात देखील सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात  कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झालं आहे, असं डॉ. मोंगा यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola