Medical Exam | वैद्यकीय परीक्षा पुढे ढकला, पण रद्द करू नये, मार्डची भूमिका;तर परीक्षा रद्द करा विद्यार्थ्यांची मागणी
Continues below advertisement
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 4 ऑगस्ट पासून सुरू होणार असून एम डी, एम एस परीक्षा 25 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा देण्यास विद्यार्थी तयार असून या परीक्षा कोणत्याही प्रकारे रद्द करण्यात येऊ नये अशी भूमिका मार्ड निवासी डॉक्टर्स संघटनेकडून मांडण्यात आली आहे. 25 ऑगस्ट पासून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा पदव्युत्तर अभ्यासक्रम घेणारे एम डी, एम एस चे विद्यार्थी देण्यास तयार असून 45 दिवसाचा अभ्याससाठी जो अवधी देण्यात आला आहे त्यात आम्ही कोरोनाच्या कामातून वेळ काढून अभ्यासाला लागलो असल्याच मार्ड कडून सांगण्यात आलंय. शिवाय, जर सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याच ठरवलं तरी सुद्धा आम्ही त्याचं स्वागत करू पण या परीक्षा रद्द होऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका मांडलीय.
Continues below advertisement