Konkan Help | निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेलं कोकण सावरण्यासाठी मराठी कलाकार, क्रिकेटपटूंची मदत

मनोरंजनपर कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकांच्या माध्यमातून हा निधी उभा केला जाणार आहे. ‘दिवा लागू दे रे देवा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा निधी गोळा केला जाईल. या कार्यक्रमामध्ये नामवंत गायक, वादक, कवी यांचा सहभाग असेल. साथीला अनेक आजी माजी क्रिकेटपटू आपल्या करिअरमधील धमाल किस्से सांगतील. संपूर्ण कुटुंबाची करमणूक होईल असा हा कार्यक्रम असेल. 2 ऑगस्ट रात्री 8 वाजता ऑनलाईन हा कार्यक्रम असेल. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रत्येक कुटुबांकडून पाच हजार प्रवेशिका ठेवली आहे. तिकीट बुक केल्यावर लिंक शेअर केली जाईल असं आयोजकांनी सांगितलं आहे. तिकिट बुकिंगसाठी ही वेबसाईट आहे www.shivarsansad.in

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola