Police Transfer | पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये सावळा गोंधळ, राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक PI ठरले अतिरिक्त
नागपूर : पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमधला अफलातून प्रकार सध्या समोर आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक 'अतिरिक्त' ठरले आहेत. राजकीय विनंत्यांवरून झालेल्या भरमसाट बदल्यांचे हे विपरीत परिणाम असल्याची चर्चा दबक्या स्वरात पोलीस दलात सुरु आहे. राज्यात अनेक डझन पोलीस निरीक्षक अतिरिक्त ठरल्याने ते "ना घर के ना घाट के" अशा अवस्थेत अडकले आहेत. आता हा गुंता पोलीस महासंचालक कार्यालयाने सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.