Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंनी कोण कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली ?
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंनी कोण कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली ?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झालेले आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या असूनही आम्हाला ओबीसीतून आरक्षण का दिले जात नाही. सगेसोरऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी का केली जात नाही, असे अनेक प्रश्न जरांगे यांनी केले आहेत. तसेच राज्यात मराठा समाजासह ब्राह्मण, मारवाडी, लोहार, मुस्लीम समाजातील लोकांच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनाही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. ते आज (23 जून) छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पाशा पटेल या मुस्लीम समाजाच्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे. सरकारी दरबारी मुस्लीम समाजाचीही कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मु्स्लिमांना कुणबी म्हणून आरक्षण द्यायला हवे. हे आरक्षण कसे दिले जात नाही, तेच मी बघतो. तुम्हाला कायद्याने चालायचे आहे ना. 1967 सालानंतर ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्या कोठेच नोंद नाही. तुम्ही यांना कोणत्या आधारावर 16 टक्के आरक्षण दिलं. आमच्या पाठीत खंजीर खुपसून, आमचं वाटोळं करून तुम्ही आरक्षण दिलं कसं?" असा सवाल जरांगे यांनी केला.