Manish Sisodia यांचा Pm Modi वर हल्लाबोल, एकाही पैशाचाही घोटाळा केला नसल्याचा सिसौदियांचा दावा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसौदिया यांच्या अडचणीत वाढ झालीय... सीबीआयने सिसौदियांविरोधात लूकआऊट नोटीस काढलीय... सिसौदिया आणि अन्य १३ जणांविरोधात ही लूकआऊट नोटीस काढण्यात आलीय.... या नोटीशीनुसार या चौदा जणांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आलीय... केजरीवाल सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यासंबंधात सीबीआयने सिसौदियांच्या घरी छापेमारी केली होती... या छापेमारीनंतर आल्याला अटकही होईल अशी शक्यता सिसौदियांनी वर्तवली होती.. यानंतर २४ तासांतच सिसौदियांविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आलीय... या नोटीशीनंतर सिसौदिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय... ही नोटीस म्हणजे मोदींचं नाटक असल्याचा हल्लाबोल सिसौदियांनी केलाय.... तसंच आपण एका पैशाचाही घोटाळा केलेला नाही असा दावाही त्यांनी केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola