मालेगावात नियम मोडून जाहीर सभा घेणं पडलं महागात, माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह दोघांवर गुन्हा

मालेगाव : कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातलेली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी रौनकाबाद येथे काल रात्री जाहीर सभेचे आयोजन केलं. या सभेला त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याच पाहायला मिळालं. नियम मोडून जाहीर सभा घेणं माजी आमदारांच्या अंगलट आहे. पोलिसांनी माजी आमदार असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola