महेश मांजरेकर यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप, गाडीला धडक दिल्यानं दिली चापट!
मुंबई : गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा पाठीमागून धक्का लागल्यावर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.