Dilip Walse Patil on Amravati Violence : राज्यातील हिंसाचाराप्रकरणी चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई...
नागपूर : अमरावती, नांदेड, मालेगाव शहारातील दंगल कशी झाली? हिंसक वळण कसं लागलं? याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. गडचिरोलीत 26 नक्षलींना कंठस्थान घालणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन वळसे पाटील यांनी केले. गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील हे नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयांमध्ये नक्षलवादी चकमकीतमध्ये जखमी झालेल्या पोलीस जवानांच्या भेटीसाठी आले त्यावेळी ते बोलत होते.
Tags :
Amravati Maharashtra Riots Amravati Riots Dilip Walse Patil Dilip Walse Patil On Amravati Riots Dilip Valse Patil PC Home Miinister Of Maharshtra