Zero Hour Atul Bhatkhalkar:विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसमसोर लीन झाले,भातखळकरांचा आरोप

Continues below advertisement

Zero Hour Atul Bhatkhalkar:विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसमसोर लीन झाले,भातखळकरांचा आरोप

ज महाविकास आघाडीचं राजकीय गणितं पाहिली... तर लक्षात येतं की... पाच वर्षांपूर्वी जी स्थिती होती... ती आज तरी बिलकूल नाहीय.. आणि त्यामुळेच तिनही पक्षांमध्ये रस्सीखेच होतेय... त्यातही ठाकरेंच्या सेनेकडून... त्याला कारणंही तशीच आहेत.. शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदारांच्याही बाबतीनं सर्वात लहान भाऊ असलेला काँग्रेस पक्ष... मविआत मोठा भाऊ बनला.. दुसरीकडे मविआचा मोठा भाऊ असलेल्या ठाकरेंच्या सेनेचं आणि थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचं काय झालं.. हे आपल्याला ठाऊकच आहे... त्यामुळे २०१९ साली सर्वात मोठा भाऊ असलेली ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी छोटा भाऊ बनली...   आता लोकसभेच्या निकलानंतर तर त्यात आणखीच मोठी भर पडली.. सर्वात कमी जागा वाट्याला आल्यानंतरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं... आणि अनेक मोठे चेहरेसोबत नसतानाही काँग्रेसनं बम्पर यश मिळवलं... पक्षफुटीची सहानुभूतीचा फायदा होईल अशा चर्चा असतानाही ठाकरेंना मात्र, अपेक्षित यश गाठता आलं नाहीय...   आमदारांची संख्या जास्त... खासदारांचीही संख्या जास्त... अशा धर्तीवर आगामी विधानसभेत काँग्रेस सर्वाधिक जागांची मागणी करणार... अशाच चर्चा आहेत.. कारण, मेरीटवर जागावाटप व्हावं.. हीच मागणी काँग्रेस नेत्यांकडून सुरु आहे... अशात आपल्या वाट्याला समाधानकारक जागा याव्यात... किंवा जास्तीत जास्त जागा याव्यात... अशीच भूमिका ठाकरेंकडून असावी.. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्येही त्यांनी समसमान जागावाटपाचे संकेत दिलेतच... इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदाची आशाही व्यक्त केलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola