Zero Hour with Satej Patil : मुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? काँग्रेस नेते सतेज पाटलांशी चर्चा

Continues below advertisement

Zero Hour with Satej Patil : मुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? काँग्रेस नेते सतेज पाटलांशी चर्चा
महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचीही तयारी जोरात सुरुय.. त्याला आता एक बुस्ट सुद्धा मिळाला आहे.. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी महाराष्ट्रासह देशभरातच अपेक्षेप्रमाणे झाली नाही.. ४०० पारचा नारा देेणारा भाजप दोनशे चाळीस वरच अडकला.. त्याचं एक कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपसाठी जोर लावला नाही असं दिलं गेलं.. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आता भाजपला संघाची गरज उरली नाही या वक्तव्याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं.. संघाच्या मुखपत्रातही मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली गेली.. महाराष्ट्रात अजित पवारांना सोबत घेणं भोवलं असं निरिक्षण संघ परिवाराकडून नोंदवलं गेलं.. संघ थेट राजकारणात सक्रीय नसला तरी संघाच्या यंत्रणेचा भाजपला फायदा होतो हे वेळोवेळी दिसलं आहे.. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न विचारला जात होता.. त्याचं उत्तर मिळालं आहे.. महाराष्ट्रात संघ आणि भाजपामध्ये समन्वय राहावा यसाठी आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.. येत्या महिन्यातभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका आणखी वाढतील असं सांगितलं जातंय. अर्थात भाजपच्या नेत्यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram