Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी

Continues below advertisement

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी
निकालाआधीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी नेत्यांनी अर्ज दाखल करतानाच फटाक्यांची तुफान आतषबाजी केली.  बरं, कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणा की पक्षाकडून झालेलं शक्तिप्रदर्शन म्हणा.. गर्दी तर नेत्यांनी आजच जमवली..  येवल्यात अजित पवारांच्या पक्षाचे छगन भुजबळ, इस्लामपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि जयंत पाटलांच्याच पक्षात नुकतेच सामील झालेले हर्षवर्धन पाटील, वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे, कोथरुडमध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील... हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर.. ठाण्यात मनसेचे अविनाथ जाधव... मंडळी ही फक्त काही प्रातिनिधीक उदाहरणं आहेत.. जिथं आज प्रत्येक नेत्यांनं तगडं शक्तीप्रदर्शन केलं..   आता आज का केलं.. याचंही एक कारण आहे... ते आहे ज्योतिष... आणि त्यानुसार आजचा मुहूर्त..  मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात ही २२ ऑक्टोबरला झाली..  आणि अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे २९ ऑक्टोबर...  याच २२ ते २९ दरम्यान एक शनिवार-रविवारची सुट्टी आहे... ते दोन दिवस सोडले तर अर्ज भरण्यासाठी इनमिन सहा दिवस उरतायत.. पण तरीही गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या ज्या विभागीय कार्यालयात शुकशुकाट होता.. तिथंच आज उभं राहायला जागा नव्हती.. अशीच गर्दी २८ तारखेहीला असणारय. त्यात २४ ऑक्टोबरला म्हणजेच आज आणि २८ ऑक्टोबरलाच नेत्यांच्या उड्या का? कारण सापडलं, मुहूर्त आणि शुभ दिवस... ज्योतिष अभ्यासकांच्या मते हे दोन्ही दिवस शुभ आहेत. २४ ऑक्टोबरला गुरूपुष्यामृत योग असल्यानं शुभ दिवस तर २८ ऑक्टोबरला स्थिर लग्न, सिंह राशीला चंद्रयोग म्हणून तोही शुभ दिवस.. मंडळी, आता आपले नेते ज्योतिषाशास्त्रावर किती विसंबून असतात.. हे आम्ही काही सांगायला जात नाही.. अनेक पुरोगामी नेतेही आहेत.. त्यांनी उघड उघड अशा गोष्टींचा विरोध केल्याचंही आपण पाहिलंय.. फार खोलात न जाता.. मी तुम्हाला हे अंकगणित.. ज्योषितशास्त्रावरच्या गोष्टी का सांगतोय.. ते आता सांगतो.. आज अर्ज दाखल करताना जितका विचार टायमिंगचा झाला.... तितकाच विचार त्यांच्याच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा झाला असेल का?  मंडळी, ज्या ज्या नेत्यांनी आज तास दोन तास शक्तिप्रदर्शन केलं.. त्यामुळे शहरातल्या किमान त्या-त्या भागाची वाहतूक व्यवस्था कोलमडली नसेल का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram