Zero Hour : 26 नोव्हेंबरला नवी विधानसभा अस्तित्वात येणार; फायदा कोणला होणार?
म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांत... त्यानुसार तुम्हाला हवी असणारी एखादी वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती ज्याच्याबद्दल तुम्ही सतत विचार करत आहात.. कल्पना करत आहात.. ती तुमच्या कल्पनेतील वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती एखाद्या चुंबकाप्रमाणे प्रत्यक्ष तुमच्या जीवनात येते... ऑस्ट्रेलियन साहित्यिक रोंन्डा बर्न यांनी The Secret पुस्तकातून आकर्षणाचा सिद्धांत मांडलाय.. आता हेच लॉ ऑफ अट्रॅक्शनवरचं पुस्तक खासदार संजय राऊतांनी वाचलंय की नाही हे माहिती नाही.. पण, त्याचा अनुभन त्यांना नक्कीच आला असेल.. तोही 2019 साली..
विधानसभेच्या निकालानंतर 2019 साली उद्धव ठाकरेंना भाजपसोबत न जाण्याचा निर्णय़ घेतला.. आणि सरकार स्थापनेची प्रक्रियाच रखडली.. नेमकं त्याच काळात संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा सुरु झाल्या होत्या.. आणि त्यात तीस दिवसांच्या तीस पत्रकार परिषदेत... संजय राऊतांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार... ही घोषणा कायम ठेवली.... आणि मविआचं ठरलं... तेव्हा मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरेंच्याच गळ्यात पडली.. मविआ सरकार निर्मितीला जुळलेल्या राजकीय गणितंचीच चर्चा झाली पण, राऊताचं मॅनिफेस्टेशनकडे कदाचित सगळ्यांनी त्यांचा आत्मविश्वास म्हणूनच पाहिलं असेल...
आज पाच वर्षानंतर राज्यात विधानसभांच्या घोषणांआधीच संजय राऊतांनी पुन्हा एकदा आत्मविश्वासानानं मॅनिफेस्टेशन सुरु केलंय.. मराठवाडा दौऱ्याची सुरुवातच... त्यांनी ठाकरे 2.0 सरकारच्या घोषणेनं केली.. इतकंच नाही तर मित्रपक्षांशी कोणत्याही चर्चेआधीच... महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री हाच मविआचा मुख्यमंत्री होणार... असं म्हणत ठाकरे 2.0 सरकार येणार.. अशी घोषणाच दिलीय..
आता संजय राऊतांनी आत्मविश्वासानानं केलेलं मॅनिफेस्टेशन खरं होतंय.. की विरोधकांनी केलेलं मॅनिफेस्टेशन