Zero Hour Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची सांगता, विधानसभेचा प्लॅन ठरला?
Zero Hour Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची सांगता, विधानसभेचा प्लॅन ठरला?
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नसल्याची शक्यता आहे... काल दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये बैठक झाली होती. त्यातला तपशील आता एबीपी माझाकडे आला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा निकालानंतर ठरणार आहे. याचा अर्थ असा की निवडणुकीआधी उद्धव ठाकरे किंवा अन्य कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येणार नाहीये. दुसरीकडे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस, आजच्या दिवशीही त्यांचा भेटीगाठींंचा सिलसिला सुरुच राहिला.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली तसंच केजरीवाल यांच्या आईवडिलांसोबतही चर्चा केली.. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि संध्याकाळी काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची देखील उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील मोर्चे बांधणी सुरु केलीय. मात्र उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशाचा चेहरा झाले आहेत असं उबाठा शिवसेनेकडून सांगितलं जातंय.