Zero Hour Vidhan Sabha : विधानसभेचं जागावाटप ते बॅटल ऑफ बारामती, सविस्तर चर्चा : ABP Majha

Continues below advertisement

Zero Hour Vidhan Sabha : विधानसभेचं जागावाटप ते बॅटल ऑफ बारामती, सविस्तर चर्चा : ABP Majha
बारामतीच्या त्याच मैदानातून खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं.. इतकंच नाही तर शरद पवारांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली... 
बारामतीत पॉवरफुल घडामोडी होत असतानाच महायुतीचं टेन्शन वाढवणाऱ्याही घटनाही घडल्यायत... त्यांचंही विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत.. 
पण, पुन्हा एकदा वळूयात उमेदवारांच्या आकडेवारीकडे. मंडळी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार काल संध्याकाळी महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी तब्बल  तीन हजार २५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हाच आकडा आज चार हजारांच्या पार गेला असेल... पण, मंडळी आज अर्ज भरुनही उमेदवारांची धाकधूक कमी झालेली नसेल...कारण, उद्याच म्हणजे २० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. आणि त्यानंतरच अधिकृत उमेदवारांची संख्या जाहीर होईल.
त्यावर आपलं लक्ष असेलच... पण, आता जरा प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची संख्या सांगतो..  आधी महायुतीचे आकडे... महायुतीकडून महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांवर २९२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे... आता तुम्ही म्हणाल की असं कसं... जागा कमी आणि उमेदवार जास्त... तर मंडळी... त्याचं कारण आहे... फ्रेण्डली फाईट्स....
कोणत्या पक्षाच्या किती जागा आहेत.. हे आपण पाहणार आहोतच.. पण, त्याआधी आणखी एक आकडा सांगतो.. जसं महायुतीनं २९२ उमेदवारी अर्ज दाखल केलेत.. तसंच महाविकास आघाडीनंही २८८ जागांवर तब्बल २९६ उमेदवार जाहीर केलेत... इथंही अशाच फ्रेण्डली फाईट्स आहेतच.. 
त्यामुळं मंडळी... उमेदवारांची संख्या फिक्स झालीय.. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणारय... हेही जवळपास फिक्स झालंयय.. त्या-त्या मतदारसंघाच्या लढतीही फिक्स झाल्यायत.. त्यामुळं उद्यापासूनच प्रचाराचा जोरदार धुरळाही उडणारय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram