Zero Hour : महायुतीचं टेन्शन वाढलं, समरजितसिंह घाटगे भाजपला धक्का देणार?
विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल तेव्हा होईल... मात्र, त्याआधीच राज्यातल्या सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केलाय.. प्रचार सुरु झाला आणि एक संकट पक्षांसमोर, खास महायुतीसमोर उभं ठाकलंय .. ते आहे... बंडखोरीचं.. आणि राजकीय पक्षांतरांचं...
तुम्ही विचाराल कि महायुतीतच पक्षांतराची भीती जास्त का आहे? महाविकासाघाडीत तुलनेनं ती कमी का आहे? त्याचे कारणच मुळात हे आहे कि इथं सर्वात जास्त सीटिंग आमदार असणारी भाजपा आहे, तर उद्धव ठाकरेंच्या तुलनेत जास्त आमदार घेऊन निघालेले एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या तुलनेत जास्त आमदार सोबत असणारे अजित पवार हि आहेत. त्यामुळे सीटिंग गेटिंग फॉर्म्युलात इथे ऑलरेडी सीटिंग आमदार भरपूर आहेत. पण त्याचबरोबर इच्छुक उमेदवार, मागच्या खेपेला त्याच मतदार संघातून निवडणूक लढवून हरलेले पण आज हि आशावादी असणारे इच्छुक किंवा ज्यांनी विरोधकांकडे मतदार संघ आहे म्हणून तिथे दावेदारी वाढवण्यासाठी अनेक वर्ष कामं केली - अशांची संख्याही जास्त आहे. आता हि मंडळी काय करणार? महाविकासघड़ी हि नवीन उमेदवारांच्या शोधात आहे आणि हि मंडळी उमेदवारीच्या.
आज ह्याच यादीत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव चर्चेत आलं. समरजीत घाटगे. कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून....
महायुतीचं टेन्शन वाढलंय... आणि त्याला कारण ठऱलेयेत समरजीत घाटगे... आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा...
कागलच्या आमदार आहेत मंत्री हसन मुश्रीफ ... अजित पवारांनी परत एकदा मुश्रिफांची उमेदवारी घोषित करून टाकली. आणि समरजीत घाटगेंच्या स्वप्नांवर पाणी फिरलं .... तिथंच राजकीय अस्तित्वासाठी म्हणून की काय भाजपसोबत असलेल्या समरजीत घाटगेंनी कार्यकर्ता मेळाव्याची घोषणा करुन टाकली.. आणि त्यांना शरद पवारांनी आपल्या पक्षाची उमेदवारी देऊ केल्याची माहितीही समोर आली.
आता समरजीतसिंह घाटगे काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल..